रहाणेच्या ट्विटवर तेंडुलकरचं उत्तर, प्रश्न वाचाल तर तुम्हीही म्हणाल..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

मुंबई - अजिंक्य रहाणेने सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून थोडा ब्रेक घेतलाय. अशात रहणे मुंबईचं स्ट्रीट फूड एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. आता मुंबईचं स्ट्रीटफूड आणि वडापाव नाही, असं होऊच शकत नाही. अजिंक्य रहाणेने नुकताच मुंबईतील स्ट्रीटफूडवर ताव मारलाय. रहाणेने त्याला मुंबईतील स्ट्रीटफूड आणि खासकरून वडापाव बद्दलचं त्याचं प्रेमदे जाहीर केलंय. आपल्या ट्विटरवरून रहाणेने नेटकाऱ्यांना वडापाव खाताना 'काय खायला आवडतं?' असा सवाल केलाय.   

अजिंक्य रहाणेने ट्विटरवर वडापाव खातानाचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये 'तुम्हाला वडापाव खाताना कोणत्या गोष्टी आवडतात?' असं विचारलं आहे. याचसोबत अजिंक्य रहाणेने सर्वांना तीन ऑप्शन्स देखील दिलेत. यामध्ये पहिला ऑप्शन वडापाव आणि चहा, दुसरा ऑप्शन वडापाव आणि आणि चटणी  आणि तिसरं ऑप्शन फक्त वडापाव असा आहे.  

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'
 
अरे बापरे ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

अजिंक्य रहाणेचा मोठा चाहता वर्ग आहे. लाखो लोकं त्याला फॉलो करतात. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू देखील आहेत. अजिंक्य राहणेचं हे ट्विट पाहून क्रिकेटचा देव आणि अस्सल मुंबईकर सचिन तेंडुलकरने चटकन यावर उत्तर दिलंय. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अजिंक्य रहाणेच्या या ट्विटवर उत्तर देत, 'मला वडापावसोबत थोडी लाल चटणी, थोडी हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची चटणी मिळाली तर या कॉम्बोची चव एक नंबर होते', असं उत्तर दिलंय.   

आता खुद्द देवाचा रिप्लाय आलाय तर राहणे गप्प कसा राहील. त्याने पुन्हा सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर उत्तर देत ग्रेट कॉम्बिनेशन पाजी असं उत्तर दिलंय. 

अरे बापरे लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..

Ajinkya Rahane asks fans about their preference while eating Vada Pav god of cricket replies

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane asks fans about their preference while eating Vada Pav god of cricket replies