डायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)

अजय दुधाणे
सोमवार, 14 जानेवारी 2019

अजितदादा यांनी पोळी भाजीचा आस्वाद घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी पालक मंत्री गणेश नाईक उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्धार मेळावे सुरु आहेत. मुरबाडमध्ये काल दुपारी, तर संध्याकाळी उल्हासनगरात हा मेळावा झाला. यादरम्यान मुरबाडहून उल्हासनगरला जाताना अजित पवार बदलापुरात थांबले.

बदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ताईज किचन मधील पोळी भाजीची माहिती घेतली. डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या तत्वाला मुरड घालत अजितदादा पवार यांनी पोळी भाजीचा मनमुराद आनंद घेतला.

अजितदादा यांनी पोळी भाजीचा आस्वाद घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी पालक मंत्री गणेश नाईक उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्धार मेळावे सुरु आहेत. मुरबाडमध्ये काल दुपारी, तर संध्याकाळी उल्हासनगरात हा मेळावा झाला. यादरम्यान मुरबाडहून उल्हासनगरला जाताना अजित पवार बदलापुरात थांबले.

बदलापुरात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून 'ताईज किचन' हे पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आलं आहे, ज्यात अत्यल्प किंमतीत कष्टकरी वर्गाला पोटभर जेवण दिलं जातं. या किचनला अजित पवारांनी भेट दिली आणि पोळी भाजीची चवही चाखली.अजित पवार हे सध्या डॉ. दीक्षित यांचं डाएट फॉलो करत आहेत. मात्र कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी त्यांनी डाएट प्लॅन मोडत पोळी भाजीची चव घेतली. यामुळे बदलापुरातल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चैतन्य निर्माण झाले.

Web Title: Ajit Pawar break diet plan on inauguration programme