डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचं कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून सरकारच्या वेबसाईट वरुन विधीमंडळांचे कामकाज प्रसारीत होत नाहीय. त्यावर अजितदादा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

विधीमंडळाच्या वेबसाईटवरील थेट प्रक्षेपण बंद असल्यानं पावसाळी अधिवेशन अजूनही जनतेला पाहता आलेलं नाही. डिजिटल महाराष्ट्र केवळ जाहिरातीपुरताच आहे असा संदेश सरकार देत आहे का? असा टोला अजितदादा पवार यांनी सरकारला लगावला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticizes BJP in monsoon session