अजित पवारांच्या बंगल्यावरील 9 जणांना कोरोना 

अजित पवारांच्या बंगल्यावरील 9 जणांना कोरोना 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुण्यासह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत तर काही दिवसांपासून दरदिवशीत अडीच ते तीन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मंत्री धनजंय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनानं गाठलं आहे. मुंबईतील कोरोनाची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावरील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. 

देवगिरी बंगल्यावरील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी दिली. मात्र, या नऊ जणांमध्ये कोण-कोण आहेत, हे गुलदस्त्यातच आहे. बंगल्यात काम करणारे आहेत, की सुरक्षारक्षक याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. माझ्या निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यात 9 जणं पॉझिटिव्ह आढळले आहेत. एखाद्याला कोरोना झाल्यानंतर त्याचा संसर्ग झपाट्यानं वाढतो, त्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढायला हवं. दरम्यान, गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अजित पवार बारामती येथील आपल्या निवास्थानावर विलगीकरणात होते. 

अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपाचं खंडण करत आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिलं आहे. पाहा पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले अजित पवार?

  • विधिमंडळाचं अधिवेशन व्यवस्थित चालावं यासाठी प्रयत्न केले, कोरोनामुळे ते आटोपतं घ्यावं लागलं.
  • केंद्रानेसुद्धा त्यांचे अधिवेशन गुंडाळलं,
  • तुम्ही देशातल्या वेगवेगळ्या राज्यांची माहिती घेतली तर हेच चित्र दिसेल
  • मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढतोय, मुख्यमंत्र्यांसह सर्वजण आवाहन करतायत.
  • काही घरात मोठ्या प्रमाणावर बाधित, 
  • सरकारी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांमध्येही कोरोना 
  • माझ्या निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यात 9 जणं पॉझिटिव्ह आढळलेत.
  • ज्याला होतो त्यांनंतर तो मोठ्या प्रमाणावर पसरतो. कोरोनाशी लढायला हवं.
  • राज्यात जे वातावरण तयार केलं आहे त्यात कोणाला पाठिशी घालणार नाही एनआयए चौकशी करतेय, एटीएस करत होती, आता तीसुद्धा चौकशी एनआयएकडे दिली.
  • यात भेदभावाचं कारण नाही जे सत्य आहे ते महाराष्ट्रासमोर येईल त्याबद्दल काळजी नको.
  • जर काही बाबतीत अजुन चौकशीची गरज पडली तर त्याबाबतही मुख्यमंत्री, राज्य सरकार भूमिका घेईल.  या आरोपात तथ्य नाही.
  • लॉकडाऊनबाबत मतमतांतरं आहेत
  • पक्षीय राजकारण न आणता आपल्या सर्वांवर संकट आहे या भावनेतून कोरोनाशी लढलं पाहिजे.
  • 45 वर्षापर्यंत वॅक्सिनची मागणी केली होती. ती पूर्ण केली त्याबद्दल आभार
  • आर्थिक चणचण असली तरी आरोग्यासाठी निधी कमी पडू द्यायचा नाही अशी राज्याची भूमिका
  • विरोधकांनी बरखास्त करा अशी ओरड लावलीय, आज या सरकारला पूर्ण बहुमत आहे.
  • राष्ट्रपती राजवटीसंदर्भात भाजप नेते
  • गेल्या तीस वर्षांपासून प्रशासनाचं काम पाहतोय, बदल्यांच्या संदर्भात जे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो विरोधकांकडून, यात जर खरंच तसं काही असेल तर कारवाई केलीच जाईल.याबद्दल पूर्ण माहिती समोर आल्यानंतर
  • राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com