INSIDE PHOTO : सध्या 'हे' नेते आहेत अजित पवार यांच्या महालक्ष्मी निवासस्थानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

रात्रीपासून अनेक महत्त्वाचे भाजप नेते हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्याची माहिती समोर येतेय.

महाराष्ट्रातील सत्तेचा ड्रामा आणखीन रंगताना पाहायला मिळतायत. काल नाट्यपूर्ण पद्धतीने देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला पाहायला मिळाला. दरम्यान या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे नेते  पवार असताना पाहायला मिळतायत. 

रात्रीपासून अनेक महत्त्वाचे भाजप नेते हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्याची माहिती समोर येतेय. तर आज देखील राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पाहायला मिळालेत. यामध्ये भाजपचे आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि दिलीप वळसे पाटील हे हजर असल्याचे फोटो आता समोर येतायत.   

Image may contain: 3 people, people sitting

 

Image may contain: 4 people, people smiling, people sitting

 

दरम्यान दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या घरी ठाण मांडून आहेत. अशातच भाजपचे राणा जगजीत सिंह यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतलीये. या नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे हे अजित पवार यांची मनधरणी करून घराबाहेर पडले आहेत. अजित पवार यांनी निर्णय बदलावा अशी त्यांनी विनंती केली. त्यासोबतच भाजपने प्रयत्न करण्यासाठी दोन आमदार पाठवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

अजित पवार राष्ट्रवादीकडे परत येणार ?

अजित पवार काल दिवसभर नेपियनसी रोडवरील श्रीनिवास पवार यांच्या घरी वास्तव्यास होते. त्यानंतर रात्री ते आपल्या महालक्ष्मी इथल्या निवास्थानी दाखल झाले. दरम्यान रात्री उशिरा अजित पवार यांना भेटण्यासाठी भाजपचे काही मोठे नेते भेटण्यासाठी गेल्याची माहिती समोर येतेय. यामध्ये भाजप नेत्यांसोबत काही वकील देखील उपस्थित असल्याचं देखील आता समोर येतंय. 

Webtitle : ajit pawar inside house exclusive photos

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar inside house exclusive photos