
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी एक सूचक ट्विटही केलंय. काय केलंय अजित पवारांनी ट्विट?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरू असतानाच त्यांनी आज वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच आज दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतही त्यांनी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी एक सूचक ट्विटही केलंय. काय केलंय अजित पवारांनी ट्विट?
फडणवीस सरकारला झटका; उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत
आज 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधानदिन! आजच्या दिवसाचे औचित्य साधत अजित पवार यांनी ट्विट केलंय. 'Our Constitution has helped us shape the democratic India of today & will help us define our tomorrow!' याचाच अर्थ असा की, 'आपल्या संविधानाने लोकशाही असलेला भारत साकारायला मदत केली, आणि उद्याही हे संविधान अशीच मदत करेल' असे सूचक ट्विट अजित पवारांनी आज केले आहे. उद्या बहुमत चाचणी आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी असे ट्विट केल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Our Constitution has helped us shape the democratic India of today & will help us define our tomorrow!#ConstitutionofIndia #ConstitutionDay pic.twitter.com/R1UB0cPJJl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 26, 2019
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडल्यानंतर त्यांना विधानसभा अधिवेशनात सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे दिले आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला अतिरिक्त कोणते आमदार मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या एक महिन्यापासून भाजप नेत्यांनी अन्य पक्षांतील आमदार मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही, बहुमतासाठी आमदार मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सोडले नसल्याचे सांगण्यात येते.
अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क