मख्यमंत्री फडणवीसांची 'ट्यूशन' घेण्यास अजित पवार तयार

शुक्रवार, 25 मे 2018

'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे', असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

मुंबई- 'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, महाराष्ट्राचे सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो असे ट्विट करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. काल(गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी असे वक्यव्य केले होते त्यावर अजित पवार यांनी आज ट्विटरवर प्रतिक्रीया दिली.

'कधी कधी RSS शाखेचे शिक्षण अपुरे पडते, जेव्हा कळते की, प्रत्यक्षात जनतेचे नुकसान होतेय. महाराष्ट्र सरकार कसे चालवायचे यासाठीचे प्रशिक्षण स्वेच्छेने मोफत देऊ शकतो. राज्य शासन चालविणे आणि गरीब व शेतकऱ्यांप्रति सहानुभूती कशी असावी, याचे अभ्यासक्रम देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे', असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वर्ष झाली तरी अजून अभ्यासच करत आहेत, त्यांना ट्यूशनची गरज असून अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही असे वक्यव्य काल(गुरुवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात केले होते. 

Web Title: ajit pawar tweets cm devendra fadanvis for taking tutions