मुंबईत पाकिस्तान मेड भारतीय बनावट नोटा ? NIA कडून एकाला अटक

मुंबईत पाकिस्तान मेड भारतीय बनावट नोटा ? NIA कडून एकाला अटक

मुंबई, ता.08 : पाकिस्तानातून तयार करण्यात आणलेल्या बनावट नोटा भारतात आणल्याप्रकरणी ट्रॉम्बे चिताकँप येथून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अकबर हुसैन ऊर्फ राजू बटला या ४७ वर्षीय इसमाला नुकतीच अटक केली. 23 लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी ही अटक करण्यात आली असून आरोपी सराईत आहे. यापूर्वी रक्तचंदन तस्करीप्रकरणीही त्याला रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून आरोपी ट्रॉम्बे येथून विधानसभेची निवडणूकही लढला होता.

राजू बटला चिताकँप येथील पावलीपाडा येथील रहिवासी आहे. पाकिस्तानातून दुबईत बनावट नोटा पाठवण्यात आल्या होत्या. या नोटा घेऊन येताना मुंबई विमानतळावरून जावेद गुलामनबी शेख याला अटक करण्यात आली होती. राजू बटलासाठीच या नोटा आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचा विमान खर्च व व्हिसा सर्व राजू बटलाच्या मार्फत झाल्याच संशय एनआयएला आहे. याप्रकरणी भादंवि कलम 489 (अ), 489 (क), 120 (ब) व 34 सह युएपीएस कायदा 1967 कलम 15(1)(अ)( व 16 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाटलाविरोधात यापूर्वी 24 गुन्हे दाखल होते.

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मारण्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक झाली होती. याशिवाय सप्टेंबर महिन्यात बटलाला रक्त चंदन तस्करीप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली होती. आरोपीच्या वांगणी येथील फार्म हाऊसमध्ये खड्डा खणून त्याल तीन हजार 750 किलो रक्त चंदन लपवण्यात आले होते. आरोपी अणुशक्त नगर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढला होता. त्याला 1980 मतं मिळाली होती. त्याची पत्नीही माजी नगरसेविका आहे. अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यासोबत बटलाचे छायाचित्र आहेत. तसेच चिताकँप परिसरात समाज सेवक म्हणून तो प्रसिद्ध आहे. तसेच तो बांधकाम व्यावसायिकही आहे.

जानेवारी, 2020 मध्ये कळवा पश्चिम येथील रहिवासी असलेला जावेद गुलामनबी शेख याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावरून अटक करण्यात आली होती.  त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या 1193 (23 लाख 86 हजार रुपये किंमतीच्या) बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. टॉलीमध्ये गुप्त जागा बनावून त्यात उशीमध्ये लवपून या नोटा आणण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सुरवातीला सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

14 फेब्रुवारीला हे प्रकरणी एनआयएला पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या नोटा उच्च प्रतिच्या आहेत.खऱ्या नोटा व या नोटांमधील फरक ओळखता येत नसून या नोटा पाकिस्तानातून आणण्यात आल्या आहेत. त्यासाठी जावेद स्वतः दुबईला गेला होते. चौकशीत आरोपींना दुबईत सरदार नावाच्या व्यक्तीने या नोटा सुपूर्त केल्या होत्या. हा सरदार कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा संशय आहे. या नोटा जावेदने राजू बटलाच्या सांगण्यावरून आणल्याचा संशय आहे. त्यासाठी दुबईचे तिकीट व इतर खर्च बटलाने केल्याचा आरोप आहे. 5 डिसेंबरला बटलाला याप्रकरणी न्यायालयीन कोठडी झाल्याचे एनआयए सूत्रांनी सांगितले


akbar batala arrested by NIA fake pakistan made fake indian currency

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com