नाट्यगृहात रंगले खुर्चीसाठी नाट्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारीही नाट्यरसिकांचा उत्साह पाहायला मिळाला. प्रेक्षकांसोबतच राजकारणीही नाटक पाहण्यासाठी तेवढेच उत्सुक असल्याचे नाट्य कालिदास रंगमंचाच्या ठिकाणी पाहायला मिळाले.

एक तासाचा विलंब झाल्यानंतरही बसण्यास जागा नसल्याने खुर्चीसाठी प्रेक्षकांमध्ये नाट्य रंगले. त्यामुळे नाट्यप्रयोग मध्येच थांबवावा लागला. अखेर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी प्रेक्षकांची समजूत काढत प्रेक्षागृहात जमिनीवर बसून नाटक पाहण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः ही त्यांच्यासोबत जमिनीवर ठाण मांडले. काही काळ निर्माण झालेल्या या वादानंतर अखेर पुन्हा पहिल्यापासून नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला.

पुणे येथील बृहन्महाराष्ट्र विद्यालयाचे "इतिहास गवा है' या नाटकाचा प्रयोग दुपारी 2 वाजता झाला. पुण्याहून येणारे कलाकार आणि त्यांच्या सेट उभारणीमध्ये एक तासाचा विलंब झाल्याने नाटक दुपारी 3 वाजता सुरवात झाली. हे नाटक पाहण्यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, भाजप खासदार किरीट सोमय्या हेही उपस्थित होते. नाटकास विलंब होऊनही प्रेक्षकांचा उत्साह दांडगा होता. काहींनी उभे राहून नाटक पाहणे पसंत केले; तर काही प्रेक्षकांमध्ये खुर्चीसाठी नाट्य रंगले.

Web Title: akhil bhartiy marathi natya sammelan