मराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना पोस्टरद्वारे मानवंदना देण्यात येणार आहे. ही पोस्टर काव्यकट्ट्याच्या मंडपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 52 कवी-कवयित्रींना पोस्टरद्वारे मानवंदना देण्यात येणार आहे. ही पोस्टर काव्यकट्ट्याच्या मंडपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

केशवसुत, बहिणाबाई, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, इंदिरा संत, शिरीष पै आदी 52 कवी-कवयित्रींच्या कविता आणि व्यक्तिचित्रांची पोस्टर यवतमाळमधील संजय सावंजवार, रणजित वनकर, रवींद्र क्षीरसागर हे कलाकार साकारत आहेत. नव्या पिढीला प्रतिभावंत कवींची ओळख व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे, असे साहित्य संमेलनाचे प्रसिद्धिप्रमुख काशिनाथ लाहोरे यांनी सांगितले.

यवतमाळ येथील साहित्य संमेलनातील कविसंमेलनात 52 कवींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वऱ्हाडी बोलीतील कविसंमेलनात 22 कवी सहभागी होतील. कविकट्टा उपक्रमासाठी 1300 कविता आल्या असून, त्यापैकी 500 कवितांचे सादरीकरण केले जाणार आहे.

Web Title: Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan