दारूचा ट्रक लुटणारे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

मुंबई-आग्रा मार्गावरील खर्डीनजीक लाखो रुपये किमतीच्या मद्याचा ट्रक लुटून फरार झालेल्यांना शहापूर पोलिसांनी नाशिक येथून मुद्देमालासह अटक केली. त्यांना शहापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

खर्डी : मुंबई-आग्रा मार्गावरील खर्डीनजीक लाखो रुपये किमतीच्या मद्याचा ट्रक लुटून फरार झालेल्यांना शहापूर पोलिसांनी नाशिक येथून मुद्देमालासह अटक केली. त्यांना शहापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

शहापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 72 लाखांचा दारूचा साठा जप्त केला आहे. एका टेम्पोतून हा माल मुंबईला आणला जात होता. त्या वेळी खर्डीनजीक एका उतारावर चालक चंद्रशेखर यादवला मारहाण करत अज्ञातांनी हा ट्रक पळवला होता. ट्रक काही अंतरावर टाकून मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली होती. शहापूर पोलिसांच्या पथकाने शिर्डी-नाशिक मार्गावर चिंचोली येथे एका धाब्यावर त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. धक्‍कादायक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील पहेलवान भरत पाटील याचाही समावेश आहे. त्याला सरकारतर्फे रेल्वेत तिकीट तपासणीसाची नोकरी मिळाली होती.

त्याच्यासह राहुल सोनवणे, आकाश सानप, योगेश नेवाळे यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज राजपूत याच्यासह संजय वाघ व त्यांचे साथीदार अमर व राजा हे चौघे दरोडेखोरही फरार झाले आहेत. 

Web Title: Alcohol carrying truck man arrested