मद्यपी वाहनचालकांची जबाबदारी हॉटेलमालकांवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची जबाबदारी आता हॉटेलमालकांवरच असेल. याबाबत वाहतूक पोलिसांनी हॉटेलमालकांना सूचना केल्या आहेत. या तळीरामांना पकडण्याकरिता अद्ययावत "ब्रेन ऍनलायझर' मशिनचा वापर केला जाईल. 

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची जबाबदारी आता हॉटेलमालकांवरच असेल. याबाबत वाहतूक पोलिसांनी हॉटेलमालकांना सूचना केल्या आहेत. या तळीरामांना पकडण्याकरिता अद्ययावत "ब्रेन ऍनलायझर' मशिनचा वापर केला जाईल. 

नाताळनंतर मुंबईत रात्री दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार सुरू असतात. अपघात रोखण्याकरिता पोलिस ठिकठिकाणी पहाटेपर्यंत नाकाबंदी करून कारवाई करतात. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला रात्री मद्य पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी 705 जणांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यात दोन महिलाही होत्या. साकीनाका ते दहिसर या पट्ट्यात असे अनेक प्रकार उघड झाले होते. यंदा 31 डिसेंबरला मद्यपीचालकांमुळे अपघात होऊ नयेत याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. मद्यपी ग्राहक वाहन चालवत असेल, तर त्यास आक्षेप घ्यावा, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी हॉटेलमालकांना केली आहे. या ग्राहकांसाठी हॉटेलमालकांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले आहे. मद्यपी वाहनचालक "ब्रेथ ऍनलायझर' मशिनमध्ये हळूच फुंकर मारतात. त्यामुळे पोलिस अद्ययावत ब्रेन ऍनलायझरचा वापर करणार आहेत. तळीरामांची माहिती थेट पोलिसांच्या सर्व्हरवर अपलोड होईल. 

थर्टी फस्टच्या रात्री वाहतूक पोलिस रस्त्यावर असतील. मद्यपी चालकांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी हॉटेलमालकांची असेल. ब्रेन ऍनलायझर मशिनचाही त्या रात्री वापर केला जाईल. 
- मिलिंद भारंबे, सहआयुक्त (वाहतूक) 

Web Title: Alcoholic vehicle drivers are responsible hotel owners