रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश 

रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश 

मुंबई - शालिमार एक्‍स्प्रेसमध्ये स्फोटक वस्तू सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून कसून तपासणी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

सीएसएमटी स्थानकावर गुरुवारी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या स्थानकातून दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात. याशिवाय सागरी सुरक्षेबाबतही सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. स्थानकांवर पोलिस बंदोबस्तही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर उभ्या असलेल्या शालिमार एक्‍स्प्रेसमध्ये स्फोटके सापडल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली होती. तपासणीत प्रत्यक्षात ते धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस येथूनच सुटतात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच वर्दळ असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com