पाताळगंगा पुरामुळे यंत्रणा सतर्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मुसळधार पाऊस आणि पाताळगंगा नदीला आलेला पूर यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच नदीकाठावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

खोपोली : पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आला आहे. प्रशासनानेही या पार्श्‍वभूमीवर खोपोली पालिका आणि खालापूर तालुका आपत्कालीन पथक 24 तास सज्ज ठेवले आहे. 

मुसळधार पाऊस आणि पाताळगंगा नदीला आलेला पूर यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच नदीकाठावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

पावसाचा जोर कायम असल्याने खोपोली पालिका आणि खालापूर तालुका आपत्कालीन पथक 24 तास सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिस प्रशासनही सावध असून, धोकादायक ठिकाणी आणि पाणीप्रवाहात जाण्यापासून नागरिक, पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी खोपोलीतील सामाजिक संघटनाही 24 तास मदतीसाठी सज्ज आहेत. 

गेल्या चार दिवसांतील अतिवृष्टीमुळे खालापूर तालुका आणि खोपोली शहरात मोठी दुर्घटना घडली नसली, तरी दरड आणि मोठे वृक्ष कोसळणे, रस्ते खचणे असे प्रकार दररोज घडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert system due to flooding