corona positive
corona positive

अलिबाग हदरलं, 24 तासात इतक्या जणांना कोरोनाची लागण

अलिबाग : अलिबाग तालुक्यात गेल्या 24 तासात सुमारे 11 नवे कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत. त्यात दहा ग्रामीण भागातील असून एक अलिबाग शहरातील आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये अलिबाग शहरातील पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबधितांच्या वाढत्या संख्येमुळे अलिबागकराची चिंता वाढली आहे. 

तालुक्यात बुधवारी (ता.27) सापडलेल्या अकरा जणांमध्ये अलिबाग शहरातील एक, परहूरपाडा एक, नारंगी- भुनेश्ववर दोन, मानकुळेमध्ये  दोन, सुडकोलीमध्ये दोन आणि तळवलीमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.नव्याने आढळलेल्या रुग्णाच्या परिसरातील क्षेत्र प्रतिबंधक करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांवर अलिबाग सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधीतांचा आकडा 31पर्यंत पोहचला आहे. यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्यस्थितीत 26 व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.       

अलिबाग तालुक्यात गेल्या 25 दिवसात आतापर्यंत 20 कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील तिघे जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांमध्ये नोकरदारांची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्यात आतापर्यंत तळवडेमध्ये सहा, मोरोंडेमध्ये एक, रामराज मराठा आळीमध्ये तीन, बहिरोळे - मापगावमध्ये दोन, भुनेश्वर- नारंगी येथे एक, सुडकोलीमध्ये एक, कोलगावमध्ये एक, मानकुळे एक, खिडकीमध्ये तीन, सारळमध्ये एक अशा एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाली.

in alibag Coronavirus infection in 11 people in 24 hours 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com