esakal | अलिबागचा पांढरा कांदा चमकला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अलिबागचा पांढरा कांदा चमकला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर त्याला अशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

रायगडचा पांढरा कांदा आकाराने मध्यम असून चविष्ट आहे. त्याला आता मागणी वाढू लागल्याने आता हे पीक घेणाऱ्या शेतकन्यांची संख्याही वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील काले, बंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात या कांद्याची लागवड करण्यात येते. कार्ले परिसरात प्रत्येक शेतकरी त्याची लागवड करतो. रोहा तालुक्यातील खांव व देवकान्हे या गावांमध्ये काही प्रमाणात लागवड केली जाते. या कांद्यापासून सुमारे सहा टन उत्पादन मिळते. याद्वारे सुमारे तीन कोटींची उलाढाल होते; तर दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिवाह चालतो.

हेही वाचा: नगरसेवकांना हवी असलेली मर्जीतील कामे करता येणार

भात कापर्णांची कामे संपल्यावर नोव्हेंबरला या कांद्याच्या लागवडीला भात कापर्णांची कामे संपल्यावर नोव्हेंबरला या कांद्याच्या लागवडीला सुरुवात होते. दोन ते अडीच महिन्यांत पीक तयार होते. त्यानंतर माळा तयार करून बाजारात आणतात. जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसह नवी मुंबई, मुंबईसह हैदराबाद येथील पर्यटकांकडूनही कांद्याला मागणी असते. काही प्रमाणात परदेशातही निर्यात होते.. मुंबई येथे चेन्नई येथील जीआय रजिस्टर प्राधिकरणाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत मानांकन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण, होणार आहे.

loading image
go to top