अलिबाग आज तापणार

file photo
file photo

मुंबई : मान्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला असला, तरी कोरड्या वातावरणामुळे उकाडा वाढू लागला आहे. त्यामुळे अलिबाग येथे गुरुवारी (ता. 17) तापमान 38 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्‍यता आहे. मुंबईत तापमान 37 अंशापर्यंत राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून, पुढील दोन दिवस महामुंबईतील वातावरण कोरडे राहणार आहे. 

मुंबईसह महामुंबईतील तापमानात 15 दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी मुंबईत कुलाबा येथे कमाल 36 अंश आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल 36 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. ठाण्यातील तापमान कमाल 33.8 अंश आणि किमान 25.8 अंश सेल्सिअस होते. डहाणूतही तापमापकातील पारा कमाल 35.9 अंश आणि किमान 23.3 अंश सेल्सिअसवर राहिला. 

अलिबागमध्ये बुधवारी कमाल 36.6 अंश आणि किमान 24.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. गुरुवारी अलिबागमनधील तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. मुंबई आणि डहाणूतही तापमान 37 अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून महामुंबईत बुधवारचा दिवसही कोरडाच गेला. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. पुढील तीन ते चार दिवस तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. 

...........
हे करा... 
- उन्हात फिरताना टोपी वापरा अथवा डोके झाका. 
- पाणी किंवा ताज्या फळांचा रस प्या. 
- हातगाड्यांवरील कापलेली फळे, बर्फ घातलेले सरबत टाळा.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com