अलिबाग ठरणार स्फूर्तिस्थळ 

महेंद्र दुसार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेने पालिकेने किनारा सौंदर्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहकार्याने तो आकाराला येत आहे. त्यानुसार किनाऱ्यावर ठेवण्यासाठी महिन्याभरात रणगाडा अलिबागमध्ये दाखल होणार आहे. तो 39 टन वजनाचा असून लांबी 28 फूट, तर रुंदी 12 फूट आहे. 

अलिबाग : अनेक ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध असलेल्या अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या शहराचे सौंदर्य आणखी खुलवण्याबरोबरच नागरिकांनी स्फूर्ती घ्यावी, यासाठी येथील समुद्रकिनाऱ्यावर भारतीय सैन्यातील लढाऊ टीके - टी 55 हा रणगाडा ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर किनाऱ्यावर "अलिबाग बीच' नावाचे फलक लावण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेने पालिकेने किनारा सौंदर्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहकार्याने तो आकाराला येत आहे. त्यानुसार किनाऱ्यावर ठेवण्यासाठी महिन्याभरात रणगाडा अलिबागमध्ये दाखल होणार आहे. तो 39 टन वजनाचा असून लांबी 28 फूट, तर रुंदी 12 फूट आहे. 

पालिकेने किनारा सौंदर्य प्रकल्पानुसार किनाऱ्यावर पर्यटकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक, ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी अद्ययावत शेड बांधले आहेत. तसेच शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी "अलिबाग बीच' नावाचे फलक लावण्यात आले आहेत. ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार असून तो एक सेल्फी पॉंईट म्हणून ओळख निर्माण करू शकतो. 

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून अलिबाग समुद्रकिनारी "वॉर ट्रॉफी' रणगाडा ठेवण्यात येणार आहे. अलिबाग पालिकेच्या वतीने त्याची देखभाल दुरुस्ती आणि त्या ठिकाणी चौथरा बांधण्यात येणार आहे. रणगाडा तरुणांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. 
- प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibaug Beach has also been created to create a unique identity of the city, which will be a tourist attraction and can create a selfie point.