अलिबाग मासळी बाजार लवकरच कात टाकणार

अलिबाग : मासळी बाजाराची पाहणी करताना नगराध्यक्ष.
अलिबाग : मासळी बाजाराची पाहणी करताना नगराध्यक्ष.

अलिबाग (बातमीदार) : शहरातील मासळी बाजाराचे लवकर रूपडे बदलणार आहे. त्यासाठी पालिकेने पावले उचलली असून बाजाराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विक्रेते आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २१ गुंठे क्षेत्रावर मासळी बाजारपेठ आहे. त्यामधील आठ गुंठे क्षेत्रावर मासळी विक्रीची इमारत आहे. ती २००५-०६ मध्ये बांधण्यात आली. इमारतीच्या परिसरात मासळी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विक्रेत्यांना बसण्यासाठी आणि मासळी सुरक्षित ठेवण्यासाठीही सुविधा आहे. 

शहराचा विकास साधण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले असून त्यानुसार मासळी बाजार आणि परिसराच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेचे पाऊल उचलले आहे. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी शुक्रवारी दुपारी मासळी बाजाराची पाहणी केली. या वेळी 
उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्यासह मासळी विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.  
पालिका बाजारात चार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. इमारतीच्या बाजूला फरसबंदी करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी बाजारात स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com