रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने केली आंतरराज्य टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

अलिबागः रायगड जिल्ह्यात मागिल दोन महिन्यांपासून कर्जत, खोपोली, पाली, माणगाव, पोलादपूर आदी पोलिस ठाणे हद्दीत हातचलाखी करून नागरिकांचे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य आरोपी वसीम सिराज अब्बास (आंबिवलीमुंब्रा), जयकुमार रजत, इरफान खान (दोघे मध्ये प्रदेश) आणि ध्रुवकुमार त्रिपाठी (उत्तर प्रदेश) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिणे, गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट डिझायर कार, होंडा, अॅक्टिवा स्कुटर असा तीन लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला केल्याचेही श्री. पारसकर म्हणाले.

तांत्रिक पद्धतीचा अवलंब व सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून या आरोपीपर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पोचण्यात यश आले. तपासा दरम्यान रायगडसह महाराष्ट्रात 21 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली असून, त्यात नागपूर शहर 11, पुणे शहर 2, पुणे ग्रामीण 3, पालघर, अहमदनगर, यवतमाळ, चंद्रपूर आणि मुंबई शहरात प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. महाराष्ट्राबाहेरील मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान येथेही गुन्हे केल्याची कबुली या आरोपींनी कबुली दिली आहे. या टोळीला अटक करण्यासाठी रायगड गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक जितेंद्र व्हनकोटी, सहायक पोलिस निरिक्षक सुहास आव्हाड, अजित शिंदे, कर्जतचे पोलिस सबइन्स्पेक्टर अमोल कराडे, पोलिस हवालदार मोहन मोरे, गजेंद्र हंबीर आदींचा समावेश आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: alibaug news raigad police arrested Inter-state gang