अलिबाग-वडखळ मार्ग अधांतरी

अलिबाग-वडखळ मार्ग
अलिबाग-वडखळ मार्ग

अलिबाग : वडखळ-अलिबाग या २२ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. त्यासाठी १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला होता; परंतु निधीअभावी तो दुपदरी करावा, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; मात्र तो स्वीकारण्यात आला नसल्याने महामार्गाचे भवितव्य अधांतरीच आहे.

अलिबाग- वडखळ महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणार होती; मात्र निधीअभावी मार्चमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाकडे सोपवली. त्यानंतर या विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपावली असली, तरी ती स्वीकालेली नाही. 

२४ गावांत भूसंपादन
अलिबाग - वडखळ मार्ग रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अलिबाग ते वडखळ या २२ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. यासाठी २४ गावांतील जमीन संपादित करण्यात येणार होती. 

नुकसान भरपाईसाठी ९०० कोटी खर्च
महामार्गावर शहाबाज ते तीनविरा असा ७.५ किलोमीटर बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येणार आहे. २२ किलोमीटर मार्गासाठी १७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. यातील सुमारे ९०० कोटी रुपये हे भूसंपादनासाठी खर्च होणार होते.

दुरुस्तीसाठी कंत्राटदाराचा पुढाकार
अलिबाग - वडखळ महामार्गावर जेएसडब्ल्यू कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता रामेश्वर कन्स्ट्रक्‍शनचे राजू पिचला यांनी दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

मार्गाची जबाबदारी निश्‍चित होत नाही, तोपर्यंत दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खर्च करण्यात येणार आहे. चारपदरी महामार्गाचा प्रस्ताव बाजूला ठेवून दुपदरी महामार्गाचा प्रस्ताव आहे. 
- एस. के. फेगडे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com