अलीच्या मुंबई भेटीविषयी एटीएसकडून तपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई - 'इसिस' या दहशतवादी संघटनेत गेलेल्या तबरेज तांबे याचा साथीदार अली याच्या मुंबई भेटीविषयीचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. अलीचे मुंबईतील नातेवाईक आणि तो कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध घेतला जात आहे. तबरेजला लीबियात पकडल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यास एटीएसने याला दुजोरा दिलेला नाही. याविषयी केंद्र सरकारकडून माहिती घेतली जाणार आहे.

मुंब्रा येथील शिवलीनगरात राहणारा तबरेज इसिसमध्ये गेला आहे. इसिसमध्ये जाण्यापूर्वी तबरेजने भावासोबत शेवटचा संवाद साधला होता. आपण जिथे आहोत, ती सुखरूप जागा आहे. उलट तुम्हीच तेथे राहायला या, असे तबरेजने भावाला सांगितले होते. एटीएसने तांबे कुटुंबाची सविस्तर चौकशी केली. त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्या आधारावर काही शक्‍यता वर्तवून एटीएस पुढील तपास करत आहे.

एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तबरेज हा अली नावाच्या मित्रासोबत मुंबईत आला होता. त्या वेळी अली मुंबईत काही दिवस राहिला होता. तो मुंबईत कुणाला भेटला होता, त्याचे नातेवाईक कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. एटीएसने तांबे कुटुंबाकडून काही गॅझेट्‌सही जप्त केली आहेत. त्याच्या तपासणीचे काम कालिना येथील न्यायसहायक प्रयोगशाळेत सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यावर काही बाबी उघड होतील. तबरेजच्या बॅंक खात्याचीही माहिती घेतली जात आहे. इसिसमध्ये जाण्यापूर्वी त्याच्या बॅंक खात्यात किती पैसे होते, हे यातून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Ali's visit to Mumbai to investigate about ats