'विद्यार्थिनींच्या शर्टात हात सरकावण्याचे आरोप'; डॉ.नटराजन यांची कॉलेजच्या 'डीन'पदी नेमणूक

'विद्यार्थिनींच्या शर्टात हात सरकावण्याचे आरोप'; डॉ.नटराजन यांची कॉलेजच्या 'डीन'पदी नेमणूक

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाशी संलग्न असलेल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर शैलेश्वर नटराजन यांची कॉलेजच्या अधिष्टाता म्हणजेच 'डीन' म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे. मात्र, डॉ. नटराजन यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात आहे. याला कारणही तसंच आहे. डॉक्टर शैलेश्वर नटराजन यांच्यावर सहा वर्षांपूर्वी महिला विद्यार्थींनीवर आणि सोबतच्या महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपात निलंबन करण्यात आलं होतं. २०१४ मध्ये निलंबन झाल्यानंतर डॉक्टर शैलेश्वर नटराजन यांना कळवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत अटक केली होती. 

९ जानेवारी २०२० रोजी कोलेजच्या डीन 'संध्या खडसे' यांच्या निवृत्तीनंतर डॉक्टर नटराजन यांनी 'प्रभारी डीन' म्हणून कारभार हातात घेतलाय. डॉक्टर नटराजन यांची 'डीन' म्हणून झालेली नियुक्ती, महिला कर्मचारी विद्यार्थिनींसाठी मोठा धक्का मानला जातोय. अनेक महिला कर्मचारी तसंच विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार करूनही २६ जानेवारी रोजी झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात डॉक्टर नटराजन आल्याने अनेकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.  

काही महिला कर्मचाऱयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्या भावना माध्यमांसमोर मांडल्यात. याबाबत बोलताना महिला कर्मचारी म्हणालात, "सध्या कोर्टात केस सुरु आहे, डॉक्टर नटराजन यांना 'प्रभारी अधिष्टाता' या पदाचा कार्यभार दिल्याने या केसही संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते अशी भीती या महिलांना वाटतेय.

मोठी बातमी - मुलं आणि महिलांच्या तस्करीबाबतचं धक्कादायक वास्तव, मुंबई एक नंबरवर तर पुणे...
 
डॉक्टर नटराजन यांची नियुक्ती ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलीये. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयस्वाल यांनी, डॉक्टर नटराजन यांची नियुक्ती 'अधिकृत' नसून 'प्रभारी अधिष्ठाता' म्हणजेच 'ऍक्टिंग डीन' अशा स्वरूपाची आहे, असं सांगितलंय. याबाबतची जाहिरात वर्तमान पात्रात दिलेली आहे, या पदासाठी योग्य व्यक्ती सापडल्यास नटराजन यांना हटवण्यात येईल, असं देखिल आयुक्त संजीव जयस्वाल म्हणालेत.

दरम्यान लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी विचारलं असता, "विभागीय चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने डॉक्टर नटराजन यांना पुन्हा कामावर घेतलं गेलंय", असं ठाणे आयुक्त संजीव जयस्वाल म्हणालेत. 

डॉक्टर नटराजन यांच्याविरोधात तब्ब्ल २० विद्यार्थी आणि १० हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी  लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केलेली आहे. कॉलेजमधील प्रॅक्टिकल्स दरम्यान छातीच्या आजारांवर काम करण्याच्या तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण देण्याचा दावा करीत डॉक्टर नटराजन मुलींच्या शर्टमध्ये हात सरकवायचे. या सोबतच डॉ. नटराजन यांनी एकदा महिला विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्गासमोर स्तनपरीक्षण करण्याचे आदेश दिले होते, अशा त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत.

याबाबत कॉलेज आणि रुग्णालयाच्या 'महिला लैंगिक अत्याचार विरोधी कमिटी'कडे आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे इमेल करून तब्बल वीस विद्यार्थी आणि १० कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती. यानंतर आलेल्या अहवालाच्या आधारे डॉक्टर नटराजन यांना दोषी मानत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. कळवा पोलिसांनी डॉक्टर नटराजन यांना अटक देखील केली होती. मात्र, एका महिन्यात जामिनावर नटराजन यांची सुटका झाली. २०१६ साली पुढील चौकशीत डॉक्टर नटराजन दोषी नसल्याचं पुढे आल्याने त्यांची पदावनती (डिमोशन) करत पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे. 

allegation of obscene behaviour with female students and staff dr natrajan comes as dean of the college 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com