सोनू निगमला हे काय झालं? इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

 सोनू निगमला हे काय झालं? इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

मुंबई- अभिनेता सोनू निगमला सी फूड खाणं महागात पडलं आहे. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं सोनू रुग्णालयात भरती होता. सोनूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीचं रुग्णालयात दाखल झालो होतो. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं अशी परिस्थिती ओढावली असल्याचे त्याने सांगितले.


काही पदार्थ खाताना अवश्य काळजी घ्या असा सल्लाही सोनू निगमने चाहत्यांना दिला आहे. अॅलर्जीमुळे मला थेट आयसीयूमध्ये मला दाखल व्हावे लागले. नानावटी रुग्णालयाच्या परिसरात मी असल्याने मी तिथे लगेच दाखल झालो. रुग्णालय जवळ नसते तर हे प्रकरण माझ्या जीवावर बेतले असते त्यामुळे तुम्ही देखील अॅलर्जी असल्यास कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दाखवू नका. असे आपल्या इन्स्टाग्रामवर लिहलेल्या पोस्टमध्ये सोनू निगमने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com