ठाण्यात आघाडीत बिघाडी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

ठाणे - महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून साठ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत; तर राष्ट्रवादीकडून सुमारे 91 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अशा वेळी ठाण्यात आघाडी झाल्याचे जाहीर केल्यानंतरही सध्या स्थानिक नेते आघाडीबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास तयार नसल्याने आघाडीच्या उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे.

शिवसेना, भाजप, मनसे, कॉंग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे; पण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले होते. आताही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडे संपर्क साधला असता आघाडीबाबत सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केला; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज का दाखल करण्यात आले, याचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत आघाडीचा संभ्रम कायम राहणार असल्याचे समजते.

त्यातही वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची वारंवार चर्चा होते आहे; पण कॉंग्रेसच्या नेत्यांकडून या मैत्रीपूर्ण लढतींना विरोध असल्याचे कळते. लढायचे असेल, तर 130 जागांवर एकत्रित; नाही तर सर्व जागांवर विरोधात लढण्याची आक्रमक भूमिका कॉंग्रेसच्या एका गटाने घेतली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून गुरुवारपर्यंत आघाडीच्या वतीने कोण किती जागा लढविणार, हे जाहीर होणे अपेक्षित होते. आघाडीच्या नेत्यांनीही 2 तारखेपर्यंत आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असा दावा केला होता; पण अद्यापही कळवा आणि मुंब्रा परिसरातील जागांवरून एकवाक्‍यता होत नसल्याने जागावाटपाचा फॉर्म्युला टाळण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीची बिघाडी होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Web Title: Alliance break in Thane?