सर्वपक्षीयांची जुगारासाठी युती!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

मिरा रोडच्या साईबाबा नगरमधील एका गाळ्यात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विरोधी पक्षांमधील कार्यकर्ते युतीने जुगार खेळत असताना सापडले असून त्यांची चौघांना अटक करण्यात आली आहे. 

भाईंदर ः सध्या कोण, कधी कोणत्या पक्षात असेल, ते सांगता येत नाही. आज ज्याच्यावर टीका केली, उद्या त्याच्या गळ्यात गळा घालून फिरतानाही काही कार्यकर्ते मागेपुढे पहात नाही. सत्ता, पदांसाठी पक्ष, भूमिका बदलणारे कार्यकर्ते आपण पाहतोच; मात्र एरव्ही एकमेकांच्या विरोधात बोलणारे, उणीधुणी काढणारे कार्यकर्ते पक्षभेद विसरून जुगारासाठी एकत्र आल्याचे मिरा रोडमध्ये उघड झाले आहे.

मिरा रोडच्या साईबाबा नगरमधील एका गाळ्यात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विरोधी पक्षांमधील कार्यकर्ते युतीने जुगार खेळत असताना सापडले असून त्यांची चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौघांना जुगार प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल, रोख आणि पत्ते असा 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. 

राजू खान (वय 34, रा. कोकणी पाडा, दहिसर), दिलावर मुर्तुझा शेख (39, रा. साईसिध्दी वर्षा टॉवर, शीतल नगर), सैफुल्ला फजलउल्ला खान (36, रा. क्‍लस्टर नं. 4, मीरारोड), शाहिद खान (30, रा. गीता नगर फेज-4, नया नगर), सलाउद्दीन सर्फराज खान (रा. स्वागत टॉवर, नरेंद्र पार्क) आणि सॅबी फर्नाडिस (रा. शांती नगर, मिरा रोड) हे तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकताच यातील सॅबी आणि सलाउद्दीन पोलिसांची नजर चुकवून पळून गेले. 

अनोख्या युतीची जोरदार चर्चा 
हनिफ हा कॉंग्रेसच्या एका संघटनेचा पदाधिकारी आहे, तर सॅबी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. दिलावर, शाहिद भाजपशी संबंधित आहेत. हनिफ याच्या कार्यालयातच हा जुगारा खेळला जात असल्याने एकूणच जुगारात कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेची युती पाहायला मिळाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alliance for the gambling of all parties in Mira Road near Mumbai

फोटो गॅलरी