भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण द्या; पाहा कोणी केली मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करावे, अशी विनंती भाजपच्या  घटक पक्षांनी राज्यपालांना केली आहे. 

मुंबई : भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. त्याखालोखाल शिवसेना आहे. हे दोन पक्ष युतीने विधानसभेला सामोरे गेले होते.मात्र सत्तेतील वाट्यावरून भाजप-शिवसेनेमधे तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करावे, अशी विनंती भाजपच्या  घटक पक्षांनी राज्यपालांना केली आहे. 

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी भेट घेतली.राष्ट्रीय समाज पक्षाचे महदेव जानकर,रिपाईचे नेते अविनाश महातेकर, शिसःग्रामचे नेते विनायक मेटे,रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना भेटून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

मोदींनी दिल्या महापर्व छटपूजेच्या शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alliance parties demands governor to invite BJP for government