शिवसेनेशी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर असलेली युती राहिली पाहिजे - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

शिवसेना-भाजप यांच्या युतीबाबत व वादांवर चर्चा करचाना गडकरी म्हणाले की, 'दोन पक्ष एकत्रं आल्यावर मतभेद व भांड्याला भांडे लागण्याचे प्रकार घडतातंच. पण भाजप-शिवसेनेचं 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशा प्रकारचं भांडण आहे. आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एकत्र होतो, पुढेही एकत्र राहू.'

मुंबई - 'हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आमची युती शिवसेनेसोबत आहे व ती तशीच राहिली पाहिजे' असे वक्तव्य आज (ता. 29) वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'साम-दाम-दंड-भेद' या संदर्भात केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी स्पष्टीकरण दिले. 'साम-दाम-दंड-भेद' याचा अर्थ 'सर्व ताकदीने लढा' असा होतो, असे गडकरी यांनी सांगितले. 

शिवसेना-भाजप यांच्या युतीबाबत व वादांवर चर्चा करताना गडकरी म्हणाले की, 'दोन पक्ष एकत्रं आल्यावर मतभेद व भांड्याला भांडे लागण्याचे प्रकार घडतातंच. पण भाजप-शिवसेनेचं 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशा प्रकारचं भांडण आहे. आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एकत्र होतो, पुढेही एकत्र राहू.' असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय स्तरावर असलेल्या कामाच्या व्यापामुळे सध्या होणाऱ्या सेना-भाजपच्या वादात मध्यस्ती करण्यासाठी मला वेळ नाही, असेही गडकरी यांनी सांगितले. 

सध्या देशभरात असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंधन दरवाढ. दररोज इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होणे, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम असून लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे वक्तव्य गडकरी यांनी केले. तसेच संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले, तर त्यात गैर काय, असा सवालही गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केला. गंगा नदीची अस्वच्छता व कमी होणारे पाणी यावर 'निर्मल गंगा' व 'अविरल गंगा' या दोन योजनांतर्गत काम चालू आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.

Web Title: alliance with shivsena on the basis of hindutva is should be remain said nitin gadkari