22 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - गर्भाच्या प्रकृतीच्या कारणास्तव 22 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. 

मुंबई - गर्भाच्या प्रकृतीच्या कारणास्तव 22 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. 

गर्भपात प्रतिबंधक कायद्यांतर्गत केवळ वीस आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्यास परवानगी आहे; मात्र गर्भाची वाढ पुरेशी झालेली नसून जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती याचिकाकर्त्या महिलेने व्यक्‍त केली होती. याचिकेवर न्या. एस. एम. केमकर आणि न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जे.जे. शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांना महिलेची तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या अहवालानुसार गर्भाच्या वाढीला धोका असून अपंगत्व येण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली होती. खंडपीठाने हा अहवाल ग्राह्य धरून महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. 

Web Title: Allow 22-week abortion