मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा द्या; केशव उपाध्ये यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

तुषार सोनवणे
Saturday, 3 October 2020

अनलॉक होत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच मुंबईतील पत्रकारांनाही उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवासाची परवानगी देण्यात यावी यासाठी भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी पाठपुरावा केला आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक होत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच मुंबईतील पत्रकारांनाही उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवासाची परवानगी देण्यात यावी यासाठी भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी पाठपुरावा केला आहे.

डहाणूत नाकामजुरांवर उपासमारीची वेळ; रोजगारासाठी शोधाशोध - 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा थांबवण्यात आली होती. यादरम्यान, राज्य सरकार, महानगरपालिका इत्यांदीमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेत प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर हळु हळु अनलॉक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असलेल्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊन असतानाही पत्रकारांचे काम सुरूच होते.

क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?

आताही पत्रकारांचे काम सुरूच आहे. त्यामुळे मुंबईतील पत्रकारांच्या मागणीचा विचार करता, त्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची परवानगी द्यावी यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पिऊश गोयल यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी मुंबई उपनगर तसेच ठाणे अशा इतर परिसरात राहणारा पत्रकार वर्ग मोठा आहे. त्यांचे कामही महत्वाचे असल्याने त्यांना काम करण्यासाठी उपनगरीय रेल्वेसेवेची आवश्यकता असल्याचे गोयल यांना सांगितले.

राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटून पत्रकारांच्या मागणी मांडली आहे. त्यावर गोयल यांनी राज्य सरकारने परवानगी दिली तर, पत्रकारांनाही लोकल प्रवासासाठी सकारात्मकता दाखवली आहे. आता येत्या दिवसात राज्य सरकार पत्रकारांसाठी लोकलप्रवासाची परवानगी देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

---------------------------------------------

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow local journalists to travel in Mumbai Keshav Upadhyays demand to Railway Minister