लांब पल्यावरील प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, सरकारचा रेल्वेला प्रस्ताव 

लांब पल्यावरील प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, सरकारचा रेल्वेला प्रस्ताव 

मुंबई: लांब पल्यावरील मेल, एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला पाठवला आहे. त्यानंतर रेल्वेने यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला माहिती पाठवली आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने याला मान्यता दिल्यास  मुंबई कोणत्याही टर्मिनसवर दाखल होणाऱ्या लांब पल्याच्या प्रवाशांना नियोजित स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी लोकल प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारनं सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट महिलांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली होती. त्यानंतर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली, मात्र अद्याप सरसकट प्रवाशांना परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्याबाहेरून मुंबईत पोहचणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही टर्मिनसवर पोहचल्यानंतर लोकल प्रवास सुद्धा करता येत नसल्याने नियोजित स्थानकावर पोहचण्यासाठी अडचणी येत आहे.

त्यामुळे राज्य सरकारने लांब पल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप रेल्वे मंत्रालयाने मान्यता बाकी असून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लांब पल्यावरील रेल्वे प्रवाशांना लोकल प्रवास करण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव नुकताच रेल्वेला दिला आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला कळवण्यात आले असून, मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Allow long distance passengers travel local train State Government Proposal Railways

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com