भिवंडी : अंबाडी ते उसगाव मुख्य रस्ता झाला चकाचक

दीपक हिरे
बुधवार, 24 एप्रिल 2019

भिवंडी तालुक्यातील अंबाडी वज्रेश्वरी उसगाव हा राज्य मार्ग क्रं 81 रस्ता 2012 ते 2017 या कालावधीत एमएमआरडीए यांच्याकडे होता. मात्र या दरम्यान या रस्त्याकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती, तर वज्रेश्वरी येथे रस्ताच गायब झाला होता. दरम्यान 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडी यांच्याकडे हा रस्ता हस्तांतरण करण्यात आला.

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी वज्रेश्वरी उसगाव हा रस्ता एमएमआरडीएकडे असताना कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होता व रस्त्याची अक्षरशः चालणं मुश्किल झाले होते. मात्र सार्वजनिक उपबांधकाम विभाग ठाणे यांना हस्तांतरित केल्यावर येथील रस्ता चकाचक करणयात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी वज्रेश्वरी उसगाव हा राज्य मार्ग क्रं 81 रस्ता 2012 ते 2017 या कालावधीत एमएमआरडीए यांच्याकडे होता. मात्र या दरम्यान या रस्त्याकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती, तर वज्रेश्वरी येथे रस्ताच गायब झाला होता. दरम्यान 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडी यांच्याकडे हा रस्ता हस्तांतरण करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2017-18 मध्ये अर्थसंकल्पात सदरच्या रस्त्याचे 9.50 किमी रस्त्याच डांबरीकरण व मजबुती करण काम मंजूर करून घेतले व वज्रेश्वरी येथे मुख्य गावातून जाणारा रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करून येथील कायमस्वरूपी प्रश्न सोडला. 

पावसाळ्यात पाण्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी गटार बांधून येथील रस्ता टकटक करणयात आला. यासाठी येथील संघर्ष समितीचे  सुनील देवरे व सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. टी. पाटील, तसेच अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, सचिन धत्रज, अनिल पवार या अभियंत्यांनी यांनी विशेष लक्ष देऊन तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून येथील रस्त्याचे काम टकाटक करून घेतले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: ambadi to usgaon road condition in Bhiwandi