अंबरनाथजवळ उन्हामुळे रेल्वे रुळांना तडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

अंबरनाथ - ठाणे जिल्ह्यात तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे अंबरनाथजवळ मंगळवारी दुपारी रेल्वे रुळांना तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दीड तास विस्कळित झाली होती. अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान चिखलोली रेल्वे फाटकाजवळ रूळ तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तपासणीत लक्षात आले. त्यानंतर रेल्वे यंत्रणेने त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले. या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळित झाली होती. रुळांची दुरुस्ती केल्यानंतर दुपारी 3.15 वाजता वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत गाड्यांची रांग लागली होती.
Web Title: ambarnath mumbai news summer railway track