इस्त्राईलच्या राजदूतांकडून प्रगती प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मोखाडा : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पांढरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या उद्देशाने भेट दिली.

प्रथम त्यांनी वाघ्याची वाडी येथील ‘बोर्लोफ इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया’च्या (बीआयएसए) पाठिंब्याने सुरू असलेल्या आधुनिक अशा कृषी प्रकल्पाला भेट दिली. तद्नंतर वाघ गावातील जल व्यवस्थापन आणि सौरपंप प्रकल्प, तसेच खोच गावातील तलावातील मत्स्यपालन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.जव्हारमधील कर्णबधीर मुलांच्या शाळेलाही इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेट देत मुलांबरोबर आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambassador of Israel visits mokhada