भाजप साजरी करणार आंबेडकर जयंती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - देशभरातील सुमारे 20 हजार गावांतील भाजपचे लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतील; तसेच लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी (11 एप्रिल) पक्षाचे सर्व खासदार एक दिवसाचे उपोषण करतील, अशी माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. घटनेतील तरतूदी तसेच आरक्षणास कोणीही विरोध करणार नाही. विरोध करणाऱ्यांना भाजप विरोध करेल, असेही ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य देशातील घराघरांत पोहोचवायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Ambedkar Jayanti to celebrate BJP