मेड इन चायना #TikTok वर आता अमेरिकेत बंदी

मेड इन चायना #TikTok वर आता अमेरिकेत बंदी

तरुणाईला वेड लावणारं App म्हणजे टीक-टॅाक (Tik Tok). याच टीक टॅाकचा आता अमेरिकेने धसका घेतलाय. भारतात हे App अनेकदा वादात सापडलंय. मध्यंतरी भारतात या App वर बंदी देखील घालण्यात आली होती. यानंतर कोर्टातील सुनावणी नंतर भारतात Tik Tok वरील बंदी उठवण्यात आली होती. 

आता अमेरिकेने याच Tik Tok चा चांगलाच धसका घेतलाय. यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण देत अमेरिकेत Tik Tok वापरास बंदी घालण्यात आली आहे.  

Tik Tok हे मेड इन चायना App आहे. या App च्या माध्यमातून हेरगिरी केली जाऊ शकते असं अमेरिकेतील सुरक्षा विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर म्हटलंय. हे App सायबर धमकी, हेरगिरी सारख्या कामांमध्ये वापरलं जाऊ शकतं असं अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रोबिन ओचोआ यांनी सांगितलं. त्यांनी सर्वांना हे App मोबाईलमधून काढून टाका आणि त्यापासून दूर राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. त्यामुळे अमेरिकेतील लष्करात काम करणाऱ्यांना आता Tik Tok  वापरता येणार नाही. 

भारतात देखील या टिकटॉकच्या अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यामध्ये पोर्नोग्राफी तसंच सुरक्षेचा मुद्दा देखील होता. हे App त्यांच्या यूजर्सचा कोणता डेटा गोळा करतं याबाबत आता अमेरिकेकडून तपास सुरु आहे.

Webtitle : american army bans use of famous tik tok app

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com