मुंबईकरांनो काळजी करू नका, 'या' अत्यंत प्रभावी औषधाची तब्बल ३५०० इंजेक्शन हैदराबादहून आलीत

मुंबईकरांनो काळजी करू नका, 'या' अत्यंत प्रभावी औषधाची तब्बल ३५०० इंजेक्शन हैदराबादहून आलीत

मुंबई : कोरोनाचा संसर्ग जगभरात फैलावलाय. भारतातातही मोठया प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढलाय. भारत देश आता अमेरिका आणि ब्राझील या देशांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक तीनवर आलाय. अशात जगभरात कोरोनवर औषधं आणि लस शोधण्यावर संशोधन सुरु आहे. भारतात 'भारत बायोटेक' या कंपनीकडून कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरु आहे. येत्या १५ ऑगस्टला ती लस लॉन्च देखील केली जाईल असं बोललं जातंय. 

या दरम्यान एक औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतंय. हे औषध आहे रेमडेसिवीर. अमेरिकेने या औषधांचा साठा करून ठेवलाय असं देखील बोललं जातंय. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मुबंईत या औषधांच्या इंजेक्शन्सची मागणी वाढलीये. या औषधांची मागणी पाहता मुंबई महापालिकेने आधीच  १५ हजार इंजेक्शन्सची ऑर्डर दिली होती. हैदराबादमधील औषध उत्पादक कंपनीला ही ऑर्डर देण्यात आली होती. यापैकी रविवारी रात्री यापैकी ३ हजार ५०० इंजेक्शन मुंबईत विमानाने येणार होती.

त्यामुळे आता आजपासून मुंबईतील कोरोना रुग्णांना मागणीनुसार या औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. हैदराबादमधील हेट्रो हेल्थ केअर मधून खरेदी केलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या या एका इंजेक्शनची किंमत ५,४०० रुपये आहे. पण मुंबई महापालिकेला १५ हजार इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ते ४,१४४ रुपयांना उपलब्ध झाल्याचंही काकाणी यांनी सांगितले. त्यामुळे आजपासून गरजेनुसार कोविड रुग्णांना आता रेमडे सिवीर औषध उपलब्ध होणार आहे. 

amid corona 3 thousand 500 remdesivir injections arrived in mumbai from Hyderabad

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com