अनाथ मुलांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ, वसतिगृह सोडण्याची नोटीस आल्याने विद्यार्थिनी हवालदिल

अनाथ मुलांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ, वसतिगृह सोडण्याची नोटीस आल्याने विद्यार्थिनी हवालदिल

मुंबई : नोकरी करून स्वतःच्या जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांवर लॉकडाऊनमुळे मोठे संकट कोसळलले आहे. शिक्षण घेत नसल्याने वसतिगृह सोडण्याची नोटीस समाज कल्याण विभागाने विद्यार्थांना बजावली आहे. यामुळे अनेक अनाथ मुलांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

मुलुंडथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात वास्तव्य करत असलेल्या अनाथ विद्यार्थिनीस समाज कल्याण विभागाने सात दिवसात वसतिगृह खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीस रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई विद्यापीठाची पीएचडी पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने या विद्यार्थिनीवर वसतिगृह सोडावे लागणार आहे.

विद्यार्थिनीने सांताक्रूझ येथील महिला विद्यापीठातून एलएलएम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना या विद्यार्थिनीस वसतिगृहात प्रवेश मिळाला. शिक्षणासोबत काम करून ती आपला खर्च भागवत आहे. लॉकडाऊनमुळे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी घरी गेले आहेत. परंतु पंडित ही अनाथ असल्याने ती वसतिगृह सोडू शकली नाही. मिळेल ते खाऊन आजवर ती या वसतिगृहात रहात आहे. असे असतानाच या विद्यार्थिनीस समाज कल्याण विभागाने टाईल्स १९ सप्टेंबर रोजी नोटीस बजावत वसतिगृह खाली करण्याची नोटीस दिली आहे.

आपण वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थिनी नसल्याने जानेवारीपासून खोली सोडून जाण्याची तोंडी सूचना देण्यात आल्याचे या नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय. समाजकल्याण आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे खोली खाली न केल्यांस नियमाप्रमाणे आपणावर कारवाई केली जाईल असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या विद्यार्थिनीस मुंबई विद्यापीठात प्रवेश पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घायचा होता. येथे प्रवेश घेऊन याच वसतिगृहात रहाण्याचा तिचा विचार होता. परंतु लॉकडाऊनमुळे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्याने विद्यार्थिनीच्या प्रवेश झाला नाही. यामुळे या विद्यार्थिनीस वसतिगृह सोडण्याची वेळ आली आहे.

चेंबूर येथील वसतिगृहात रहाणाऱ्या राकेश हरचंदानी यालाही वसतिगृह सोडावे लागले आहे. एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीने अखेर वरळी येथील वसतीगृहाचा आसरा घेतला आहे. येथे जेवणाची व्यवस्था नसल्याने खूप अडचण होत असल्याचे, राकेश याने सांगितले. दोन महिने केटरिंगचे काम करायचे आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशांवर शिक्षण घ्यायचे, असे हलकीचे जीवन जगतो. आम्हाला कोणीच वाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

पर्यायी व्यवस्था होणार 

मुलुंडमधील वसतिगृहात रहाणाऱ्या विद्यार्थिनीस नोटीस देण्यात आली आहे. परंतु इतर विभागांशी समन्वय साधून या विद्यार्थिनीच्या पर्यायी वास्तव्याची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू आहे. असं सामाजिक न्याय विभाग सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी सांगितलंय.

अनाथ विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये राहू द्यावे आणि त्यांच्यासाठी मेस सुरू करावी. अनाथ विद्यार्थी हे शिक्षणसाठी वसतिगृहात राहतात. त्यांचे अजून महाविद्यालय सुरू झाले नाही, या विद्यार्थ्यांचे आई वडील किंवा परिवार नाही. त्यामुळे मायबाप सरकारने त्यांची व्यवस्था करावी, अन्यथा या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर राहण्यास येऊ असं हार विद्यार्थी संघटना प्रवक्ता ऍड. अजय तापकीर म्हणालेत.

( संपादन - सुमित बागुल )

amid corona student gets notice to vacant the hostel read full news 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com