Loksabha 2019 : शहांसाठी उद्धव आज गांधीनगरला 

Loksabha 2019 :  शहांसाठी उद्धव आज गांधीनगरला 

मुंबई - सत्तेत सहभागी असूनही पाच वर्षे सातत्याने भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी पुन्हा युती झाल्यानंतर मात्र "झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या भूमिकेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या वेळी ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे समजते. 

2014मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान युती न झाल्यानंतक शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. त्यावेळी उद्धव यांनी शाह यांची तुलना अफजल खानशी तुलना होती. त्यानंतरही वेळोवेळी त्यांनी जाहीर भाषणांतून शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीकेचे आसूड ओढले; मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली आहे. त्यामुळे ठाकरे गांधीनगरला जाणार आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारता त्यांनी शहा यांनी खास विनंती केल्याने ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे उत्तर दिले. 

अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत, असे यांनीच भाजपला हिणवले होते ना? मग आता अशा कोणत्या "ईडी'पिडा आल्या आहेत की अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी यांच्यावर आली आहे? 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com