मनसे नेते अमित ठाकरेंनी केलं 'असं' काही; डॉक्टर्स म्हणालेत Thank You....

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 27 April 2020

मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी डॉक्टरांसाठी पुढाकार घेत 1000 पीपीई किट्सचा पुरवठा केला आहे.

मुंबई - मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी डॉक्टरांसाठी पुढाकार घेत 1000 पीपीई किट्सचा पुरवठा केला आहे.  रविवारी कृष्णकुंज येथे मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डाॅक्टरांसाठी पीपीई किट्स, मास्क आदी साहित्य डाॅक्टरांची संस्था असलेल्या मार्डचे अध्यक्ष राहूल वाघ आणि त्यांच्या टीमकडे सुपूर्द केले. यावर निवासी डाॅक्टरांच्या मार्ड संघटनेने पत्रक काढून मनसे नेते अमित ठाकरे यांचे जाहिर आभार मानले आहेत. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई आणि विविध रुग्णालयातील डाॅक्टर उपस्थित होते. 

८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

PPE किट घालून काम करणं कितीSS कठीण आहे आहे, एकदा वाचा; आपण त्यांच्या जागी असतो तर? याची कप्लना करा...

रूग्णालयात काम करणार्या डॉक्टरांना पीपीई किट्स आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी कर्मचारी आणि डॉक्टरांनी केल्या होत्या. यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. शिवाय, रुग्णालयात येणारे रुग्ण ही कोरोना पॉझिटिव्ह असतात. यावेळी खबरदारी म्हणून पीपीपीई किट्स घालणे गरजेचे आहे. तसंच मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे उपचार केले जात असल्याने सुरक्षात्मक पीपीई किट्स चा ही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामूळे अमित ठाकरे यांनी केलेली ही मदत डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत मार्ड संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

amit thackeray helped doctors by giving them 1000 PPE kits to MARD


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit thackeray helped doctors by giving them 1000 PPE kits to MARD