esakal | Video : आदित्य ठाकरे गप्प, पण अमित ठाकरे बोलले!
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Thackeray raised voice for save Aarey Colony

मुंबईतील आरे कॉलनीमधील वृक्ष तोडीचा निर्णय हा संशयास्पद असून मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात उभे राहावे असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे.

Video : आदित्य ठाकरे गप्प, पण अमित ठाकरे बोलले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई पालिकेने आरे मधील 2700 वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया विरोधात अमित राज ठाकरे उभे ठाकले आहेत. वृक्ष तोडीचा निर्णय हा संशयास्पद असून मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात उभे राहावे असं आवाहन त्यांनी केले आहे. महत्वाचं म्हणजे आरे मधील वृक्षतोडीला विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मात्र पालिकेत सत्ता असून ही गप्प आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसाठी आरे मधील वृक्ष तोडीला विरोध केला होता. मात्र, अस असून देखील वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक उशिरा पोहोचले. यामुळे वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर झाला. यानंतर समिती मधील पर्यावरण तज्ञ असणाऱ्या एका सदस्याने समितीमधील भोंगळ कारभारावर बोट ठेवत आपला राजीनामा दिला. यावरून शिवसेनेच्या एकंदर भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे 'सेव्ह आरे'चा नारा देणारे आदित्य ठाकरे ही या प्रकरणी गप्प आहेत.

आदित्य ठाकरे यांनी जरी आरे प्रकरणी बघ्यांची भूमिका घेतली असली तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे वृक्षतोडी विरोधात उभे राहिले आहेत. आरेमधील वृक्षतोडीला 82 हजार लोकांचा विरोध असताना वृक्षतोडीचा झालेला निर्णय हा संशयास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण विकास निसर्गाचा बळी देऊन नको. सध्या जगावर 'ग्लोबल वॉर्मिंग'चं संकट घोंघावत आहे. नुकतंच अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जग हळहळतंय आणि आपण मुंबईचा श्वास असणाऱ्या आरे मधील जंगल नष्ट करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला अशी हळहळ ही त्यांनी व्यक्त केली आहे. याविरोधात तुम्ही आवाज मोठा करा, व्यक्त व्हा, मी तुमच्या सोबत आहे, मी निसर्गासोबत आहे असं आवाहन ही अमित ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे.

loading image
go to top