अमित ठाकरे घेणार रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांचे विविध प्रश्न आणि समस्यांबाबत चर्चा करून या प्रश्नांना वाचा फोडणार आहेत. यापूर्वी देखील अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष मुंबई लोकलने प्रवास करून सामान्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली रेल्वेसेवा ही मुंबईकर आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांच्या प्रवासाचं मुख्य साधन आहे. मात्र या सेवेचा लाभ घेणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती लोकसभा आणि त्या तुलनेत रेल्वेच्या कमी फेऱ्या देखील त्यामागील मुख्य कारण आहे. 

रेल्वेच्या अडचणींचा सामना हा महिला वर्गाला अधिक करावा लागतो. यावेळी पावसात देखील अनेकदा रेल्वे सेवा ठप्प झाल्याने महिला प्रवाश्यांची अधिक फरफट झाली होती.त्यात 'पीक आवर' दरम्यान रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असल्याने यावेळी प्रवास करताना महिला प्रवाश्यांना मोठी कसरत करावी लागते.असे अनेक मुद्दे अमित ठाकरे आपल्या भेटीदरम्यान रेल्वे प्रशासनाकडे मांडणार असल्याचे समजते आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Thackeray will meet Railway general manager