...तर कर्मचाऱ्यांसोबत शेकडो सेल्फी घेईन- अमिताभ

हर्षदा परब
शुक्रवार, 12 मे 2017

जगभरात १४० हजार लोकांचा हेपेटायटीसने मृत्यू होतो. त्यापैकी ६० टक्के लोक भारतातील असतात भारतात ३५ मिलियन लोकांना हेपेटायटीस बी तर ६ मिलियन लोकांना हेपेटायटीस सी ची लागण होते.

मुंबई : कोणत्याही यंत्रणेसाठी काम करणारा कर्मचारी महत्त्वाचा. हेपेटायटीसबाबत जनजागृती करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढणार असेल तर मी शेकडो सेल्फी काढायला तयार आहे, असे अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या हेपेटायटीस विरोधातील मोहीमेचे दक्षिण पूर्व आशियासाठी गुडविल अॅम्बेसेडर म्हणून अमिताभ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांचा हेपेटायटीस विरोधातील लढ्यात पूर्ण सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. तसेच, कोणत्याही मोहीमेचा चेहर असलेली सेलिब्रिटी ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी काम करणारा कर्मचारी लोकांपर्यंत पोहोचत असतो. अशा कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. पोलिओ मोहिमेसाठी काम करताना हा अनुभव आला.

प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येणार नाही. पण हेपेटायटीसविरोधात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम उत्तमरीत्या पार पाडावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सेल्फीचा जमाना आहे. त्यासाठी या मोहीमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर शेकडो सेल्फ काढायला तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अमिताभ यांनी यावेळी हेपेटायटीसच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच हा आजार उपचारांनी बरा होणारा असून त्यासाठी लोकांनी तपासणी करुन उपचार घेण्यासाठी आग्रही असलं पाहिजे असे सांगितले. यावेळी कुली चित्रपटावेळी झालेल्या दुखापतीनंतर रक्त चढविण्यात आले होते. त्या रक्तातून झालेल्या संसर्गातून हेपेटायटीस बी झाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. त्या संसर्गाने यकृताचा सोरायसीस झाला. ज्याने ७५ टक्के यकृत निकामी झाले होते. नियमित औषधोपचारांनी यावर मात करण्यात यश आल्याचा अनुभव अमिताभने सांगितला. हा  आजार लक्षात यायला सुमारे १२ वर्षे लागली. हा आजार झाल्याचे लक्षात येत नसल्याने त्याकडे लोक दुर्लक्ष करतात ते टाळले पाहिजे असे अमिताभ यांनी यावेळी सांगितले. 

जगभरात १४० हजार लोकांचा हेपेटायटीसने मृत्यू होतो. त्यापैकी ६० टक्के लोक भारतातील असतात भारतात ३५ मिलियन लोकांना हेपेटायटीस बी तर ६ मिलियन लोकांना हेपेटायटीस सी ची लागण होते.

Web Title: amitabh bachchan goodwill ambassador of campain against hepatitis b