Mumbai Rains : 'भैया, गोरेगाव लेना' म्हणत अमिताभ यांनी घेतली फिरकी

Mumbai Rains : 'भैया, गोरेगाव लेना' म्हणत अमिताभ यांनी घेतली फिरकी

मुंबई : मुंबईचे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचले आहे. मुंबईच्या 'तुंबई' स्थितीबद्दल बिग बी अमिताभ बच्चन यांनीही पालिकेला चिमटा काढला आहे. थोडक्यात मुंबई पालिकेवर टीका करण्यासाठी आता सेलिब्रिटिही पुढे आले आहेत. 

मागील वर्षी आर.जे. मलिष्काने 'सोनू...तुला मुंबईवर भरोसा नाय का...' असे गाण्यातून विचारत शिवसेनेवर टीका केली होती. यावर्षी पालिकेने मलिष्काला विविध ठिकाणचे काम दाखवून आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा मलिष्काचे 'गेली, गेली मुंबई खड्ड्यात..' हे विडंबन व्हायरल होऊ लागले आहे.

त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरुन मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. 'जलसा होते हुएँ..' असे लिहून त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधील छायाचित्र बच्चन यांच्या एका चित्रपटातले असून, या छायाचित्रात एका होडीत त्यांच्या शेजारी अभिनेत्री झीनत अमान बसल्या आहेत आणि बच्चन होडीवाल्याला ''भैय्या गोरेगाव लेना...' असे सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com