बिग बी यांनी व्यक्त केली इच्छा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - वाहतूक पोलिसांचा सदिच्छा दूत बनायला आवडेल, अशी इच्छा दस्तुरखुद्द बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी (ता. 9) वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाला भेट दिली.

28 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्‌घाटनापूर्वी अमिताभ बच्चन यांनी वरळी येथील पोलिस मुख्यालयातील अद्ययावत वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या "एमटीपी ऍप'ची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी हे ऍप स्वतःच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेतले. या वेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहपोलिस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे उपस्थित होते. बच्चन पुढे म्हणाले की, माझा आवाज आणि चेहरा जर पोलिस खात्याला उपयोगी पडू शकत असेल, तर वाहतूक पोलिसांसाठी सदिच्छा दूत म्हणून काम करण्यास मी इच्छुक आहे. याबाबत मी वेळोवेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चाही केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. त्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. ही बाब चिंताजनक असून, समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून देणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नरिमन पॉईंट येथील रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्‌घाटन केले.

Web Title: amitabh bachchan talking