मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

"महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी."

मुंबई- अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना राज्य सरकारकडे केलेल्या एका मागणीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज्य सरकारनं तयार केलेल्या महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अमोल कोल्हे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही विनंती केली आहे. 

राज्य सरकारनं थोर महापुरुषांची यादीत बनवली आहे. या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. राज्य सरकारनं यात लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. 

जाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...

महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी, असं ट्विट अमोल कोल्हेंनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सीएमओ महाराष्ट्र आणि एनसीपी स्पीक्स यांना टॅग केलं आहे. म्हणजेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केलं. 

अमोल कोल्हे यांच्या ट्विटला जवळपास 3 हजारांहून जास्त लोकांना पसंती दर्शवली आहे. तर 500 हून जास्त लोकांनी जास्त हे ट्विट रिट्विट केलंय. सध्या त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं उद्योगपतीच्या मुलाला पडलं महागात, थेट जीवावर बेतलं

कोल्हे यांची संभाजी महाराजांची भूमिका गाजली 

खासदार असलेले कोल्हे हे एक उत्तम अभिनेतेही आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या मालिका महाराष्ट्राच्या घरात घरात पोहोचल्या होत्या. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव-आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

एकीकडे PM मोदी करत होते २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा, दुसरीकडे ट्रेंड सुरु होता #SkipIntro हॅशटॅग

कोल्हेंची पत्नी केईएम रुग्णालयात बजावताहेत रुग्णसेवा 

कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या मुंबईतील केईएम रुग्णालयात  कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताहेत. त्या केईएममध्ये 2009 पासून कार्यरत आहेत. अश्विनी कोल्हे या नित्यनियमानं रुग्णांची सेवा करत असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

amol kolhe tagged cmo and demandes this thing for chatrapati sambhaji maharaj


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol kolhe tagged cmo and demandes this thing for chatrapati sambhaji maharaj