पालेकरांनी जागवल्या 'जे. जे'मधील आठवणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - एके काळी मी जे. जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात अनेक मॉडेल्सची चित्रे केली होती. आज मी "मॉडेल' म्हणून प्रांगणात आहे, याचा मला खूप आनंद होत आहे; पण माझ्या आजवरच्या जडणघडणीवर या महाविद्यालयातील शिक्षकांचा आणि मुख्यत्वे शंकर पळशीकरांचा प्रभाव आहे, अशा भावना प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या.

जे. जे. कला महाविद्यालयात प्रसिद्ध चित्रकार शंकर पळशीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. "जेजे'चा 160 वा वर्धापन दिन आणि पळशीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष या निमित्त झालेल्या "लाइव्ह पोर्टेट शो'मध्ये पालेकर बोलत होते. पालेकर यांची चित्रपट कारकीर्द सर्वश्रुत आहे; पण कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या नात्याने ते प्रथमच रसिकांसमोर आले. पालेकर यांचे पोट्रेट चितारण्यासाठी प्रा. अनिल नाईक, प्रा. मनोज पातूरकर, प्रा. नानासाहेब येवले असे दिग्गज चित्रकार हाती ब्रश घेऊन सज्ज होते. ते त्यांच्या भावमुद्रेचा सूक्ष्मातीसूक्ष्म तपशील कॅन्व्हासवर चितारत होते. आपल्या गुरूंना मानवंदना देताना महाविद्यालयीन काळातील पळशीकर यांच्या अनेक स्मृती पालेकर यांनी जागवल्या.

Web Title: amol palekar talking