एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका, पत्नी अमृता फडणवीस म्हणतात...

पूजा विचारे
Saturday, 12 September 2020

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या शाब्दिक चकमक सुरु आहे. त्यात आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खडसेंना टोला लगावला आहे.  

मुंबईः  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या शाब्दिक चकमक सुरु आहे. त्यात आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खडसेंना टोला लगावला आहे.  तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही. सर्वांचे भले होवो, असा टोला अमृता फडणवीस यांनी खडसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

हेही वाचाः  सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणः बॉलिवूडमधील 18 संशयितांची यादी तयार, NCB अधिकारी दिल्लीला रवाना

एकनाथ खडसे काय म्हणाले होते 

पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.  एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असं होते का? जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. याव्यतिरिक्त माझे जावई एनआरआय आहेत. त्यांनाही हे अधिकार आहेत असा सवाल खडसे यांनी केला होता. त्याला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

खडसेंनी व्यक्त केली खंत 

गैरसमज मी नाही तर देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की, एमआयडीसीची जमीन विकत घेतल्यानंतर माझा राजीनामा घेतला. मूळात एक इंचही जमीन मी खरेदी केलेली नाही. जी जमीन खरेदी केली ती माझ्या बायकोने आणि जावयाने केली आहे. सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचं नाव आहे. बायकोने जमीन खरेदी केलेली असताना फडणवीस खडसेंनी विकत घेतली सांगत आहेत. माझा दुरान्वये याच्याशी संबंध नव्हता. हाच असा गैरसमज घेऊन काहीतरी कारण पाहिजे म्हणून चौकशी, रिपोर्ट वैगेरे झाले. विनाकारण मला बदनामी सहन करावी लागली, असंही खंत खडसेंनी व्यक्त केली. 

अधिक वाचाः  आरोग्य खात्यानं 270 कोटी लुटले, प्रविण दरेकर यांचा आरोप
 

खडसेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर 

एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हटलं होतं. 

Amruta Fadnavis Give Answer on Eknath Khadses Allegation on twitter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadnavis Give Answer on Eknath Khadses Allegation on twitter