अमृता फडणवीस यांचे यशोमती ठाकूर आणि नीलम गोऱ्हे यांना सडेतोड उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis Yashomati Thakur and Neelam Gorhe Devendra Fadnavis mumbai

अमृता फडणवीस यांचे यशोमती ठाकूर आणि नीलम गोऱ्हे यांना सडेतोड उत्तर

डोंबिवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमक्या येत आहेत यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विधान केले आहे, यावर धमक्या येणं देशाची अवस्था सांगत नाही. काही खराब डोक्याच्या लोकांच्या दिमाखाची व्यवस्था दिसून येते अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केली. डोंबिवली मध्ये दोन गरबा उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोमवारी उपस्थिती लावली होती. यावेळी अमृता या गाणे गायल्या, तसेच ढोल देखील वाजविला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे यांना धमक्या येत आहेत यावरून देशाची राज्याची अवस्था बिघडलेली आहे असे वाटते असे विधान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता म्हणाल्या, काही लोक जे वेगळ्या डोक्याचे आहेत. त्यांची मानसिकता त्यात दिसून येते. मला वाटतं त्यांच्यातलेच ते लोक असू शकतात. आपल्याला काय माहिती, यामध्ये देशाचा काहीही व्यवस्था दिसत नाही. काही खराब डोक्याच्या लोकांच्या दिमाखाचे व्यवस्था दिसून येते असे त्या म्हणाल्या. दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरे गटाला दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाली आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आग्रह धरला असता तर शिवतीथ मिळाला असता. याला ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी एकनाथ शिंदे यांनी मन मोकळं ठेवावं आणि सत्ता देऊन टाकावी असा सल्ला देऊ केला आहे. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, काय म्हणू याच्यावर मुख्यमंत्री शिंदे हे चांगले काम करत आहेत आणि मला वाटत नाही की जिथे अपात्रिय मुख्यमंत्री पण दान करतील. जर त्यांनी कधी दान केलं तर ते दान करतील असे म्हणत त्यांनी नीलम गोर्हे यांना प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना चिन्हावर अमृता यांना विचारले असता त्या म्हणाल्या, चिन्हाचा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडे कडे आहे. तर ते लोक त्याच्यावर निर्णय घेतील. बाकी आम्ही हेच म्हणू पोट निवडणुका असो की बीएमसी निवडणुका, की पुढची निवडणूक आपल्याला प्रगतीचे राजकारण पाहिजे असे त्या म्हणाल्या.