कोपरीत अम्युझमेंट पार्क 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका कोपरी गावाशेजारी अम्युझमेंट पार्क तयार करत आहे. त्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे ते लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तयार केलेली कासवाची भव्य प्रतिकृती आहे. ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईतील म्हातारीच्या बुटानंतर हे महाकाय कासव नवी मुंबईची ओळख बनण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी उद्याने व पार्क तयार केली आहेत. वंडर्स पार्क, रॉक गार्डन, वाशीतील मिनी सी-शोअर उद्यान, सागर विहारसारखी उद्याने शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. त्यात आता कोपरीतील अम्युझमेंट पार्कची भर पडणार आहे. या पार्कमध्ये सुंदर उद्यान फुलवले आहे. मुलांसाठी खेळणी बसवली आहेत. लहान ऍम्पी थिएटर येथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे येथे महाकाय कासवाची प्रतिकृती तयार केली आहे. 

या कासवाचा पाय सहा फूट आहे. त्याची उंची 15 ते 20 फूट आहे. लांबी 40 फूट असून, कासवाच्या पोटातून पायऱ्या चढत आत जाता येईल. त्याच्या तोंडातून बाहेर डोकावता येईल अशी त्याची रचना आहे. मुंबईत जसा म्हातारीचे बूट बांधला आहे, तसे हे महाकाय कासव बनवले आहे. या कासवाच्या पोटाखाली मुलांना घसरगुंडीसारखे खेळ खेळता येतील. या कासवाची नुकतीच रंगरंगोटी केली आहे. त्यामुळे या उद्यानात ते उठून दिसते. हे कासव बाहेरून येता जाताना दिसत असले, तरी या पार्कचे उद्‌घाटन झाले नसल्यामुळे मुलांना ते जवळून न्याहाळता येत नाही. 

Web Title: Amusement Park